। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील हायवे नाका येथील हॉटेल व्यावसायिक विलास कांबळे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शाबा कांबळे (80) यांचे रविवारी (दि.24) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव असलेले महागाव-सुधागड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजबांधव, परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मीबाई कांबळे यांच्या पश्चात पती, चार मुले, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. लक्ष्मीबाई कांबळे यांचा जलदान विधी शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता महागाव येथे होणार असल्याचे कांबळे कुटुबियांकडून सांगण्यात आले.