शिंदे गटाचे नेते स्वगृही परतणार

सुषमा अंधारे यांचा गौप्य स्फोट

| कल्याण । वृत्तसंस्था ।

शिंदे गटाचे नेते, नाशिकचे खासदार हेमंत गोडसेच नाही तर अन्य पदाधिकारीदेखील आमच्या संपर्कामध्ये आहेत. नेत्यांना मंत्रिपद देतो, म्हणून त्यांच्याकडे नेलं. पण त्यांना अद्याप मंत्रिपद दिलेलं नाही, त्यामुळे अनेकजण स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.असा गौप्य स्फोट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून शिंदे गटाच्या पायाखालची माती सरकली आहे.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मंत्रिपद मिळणार म्हणून कोट शिवून ठेवलेला तो आता अमेझॉनवर विकणार की काय, अशी वाईट स्थिती आहे. महामंडळ आणि मंत्रीपद देतो, म्हणून अशी अनेक लोकांना घेऊन गेले. त्या सर्वांचा भोपळा फुटलेला आहे. शिवाय त्या सर्वांना हेही माहिती आहे की आपण यांच्याबरोबर राहून पुन्हा निवडून येणार नाही. त्यामुळे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. आमच्यासोबतच राष्ट्रवादीकडून गेलेले लोकही शरद पवारांच्याही संपर्कात आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Exit mobile version