डॉ. विजय कोकणे यांचे प्रतिपादन
| रसायनी | प्रतिनिधी |
कौशल्य विकासांना प्रोत्साहन देण्याच्या उददेशाने जे.एस.एस रायगडच्या व एस.एस.टी. कॉलेजच्या माध्यमातून राज्यस्तरीय नेतृत्व प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले, तसेच कौशल्य प्रशिक्षणातून नेतृत्व विकास हीच यशाची गुरुकिल्ली असे मत डॉ. विजय कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. सदर कार्यक्रमात जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉ. विजय कोकणे, कल्पना म्हात्रे (कार्यक्रम अधिकारी), साधनव्यक्ती गणेश भोपी,व स्वयंसेवक उपस्थित होते.संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी ,उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉ. विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंर्तर्गत कार्यक्रम राबवित असतांना संपूर्ण जिल्हाभरात व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन उपक्रम जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून राबवली जात आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमधील नेतृत्व कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने पाच दिवसीय राज्यस्तरीय नेतृत्व प्रशिक्षण शिबिर प्रेरणाचे आयोजन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एस एस टी डी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ येथे करण्यात आले आहे या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील 39 विद्यापीठांतील जवळपास 200 स्वयंसेवक आणि एनएसएस कार्यक्रमाधिकारी सहभागी झालेले आहेत.
या शिबिराचे उद्घाटन भारत सरकारचे एन.एस.एस युथ ऑफिसर सुमंत कुमार यादव, मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस सेलचे कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर, एसएसटी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी, दिलकॅप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक डिगवी, मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस सेलचे ओएसडी सुशील शिंदे एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक जीवन विचारे, राज्य संपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य डॉ. निलेश पाठक, यांच्या उपस्थितीत पार पडले.







