उरण शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती; इलेक्ट्रिक वस्तुंना शॉक

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील शिक्षण विभागाच्या इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी झिरपत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाच्या पाण्यामुळे भिंती ओल्या झाल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक यांना शाँक लागत आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन कामकाज करत आहेत. तरी कार्यालयात एखादी दुदैवी घटना घडण्याची तसेच महत्वाची कागदपत्रे भिजण्याची वाट न पाहता रायगड जिल्हा परिषदेने तात्काळ इमारतीची दुरुस्ती करण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी चक्क शिक्षक, कर्मचारी वर्ग करीत आहेत.
     

2002 ते 03 या वर्षात केंद्र व राज्य सरकारने सर्व शिक्षण अभियानांतर्गत उरण पंचायत समितीच्या आवारात तालुका शिक्षण विभागासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे काम हाती घेतले. परंतु संबंधित अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित पणामुळे बांधकामांचा ठेका घेणार्‍या ठेकेदारांनी निकुष्ठ दर्जाचे बांधकाम केल्याने शिक्षण विभागाच्या इमारतीला अनेक समस्यांनी ग्रासले.

त्यात मागील काही वर्षांपासून सदर इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागून राहिली आहे.यावर्षी पावसाने उशीराने हजेरी लावली असली तरी पावसाचे पाणी इमारतीच्या छतातून कार्यालयात झिरपत आहे.त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व संगणक यांना हात लावला असता शाँक लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग जीव मुठीत घेऊन शासकीय कामकाज करत आहेत. राज्य सरकारने, रायगड जिल्हा परिषदेने सदर इमारतीच्या छताला लागलेली गळती थांबविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. तर कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच शिक्षण विभागाची महत्वाची कागदपत्रे पाण्यात खराब होऊन संगणक नादुरुस्त होऊ शकतात अशी भिंती कार्यालयात ये-जा करणारे शिक्षक, कर्मचारी वर्ग व्यक्त करत आहेत.

शिक्षण विभाग उरण येथील इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी कार्यालयात झिरपत आहे.त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी आमच्या कार्यालयाकडून या अगोदर वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.

प्रियांका पाटील, प्रभारी शिक्षणाधिकारी
Exit mobile version