एमआयडीसीच्या पाइपलाइनला गळती

हजारो लीटर पाण्याची नासाडी
| जेएनपीटी | वार्ताहर |
उरण शहर, ग्रामीण भागातील रहिवाशांना पाणीपुरवठा करणार्‍या एमआयडीसीच्या पाइपलाइनला गळती लागली असून, हजारो लीटर पाणी वाया जात आहे. चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रहदारीच्या रस्त्याजवळच ही घटना घडली आहे. परंतु, एमआयडीसीला दुरुस्तीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मागील वर्षी नवी मुंबई, खारघर शहरातील रहिवाशांना पाणीपुरवठा करणार्‍या सिडको प्राधिकरण विभागाच्या हेटवणे पाणीपुरवठा पाईप लाईनच्या चेअरमध्ये असलेल्या मन्युअल (कव्हर) उडाल्याची घटना दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत घडली होती. यावेळी उंच उंच उडणार्‍या पाण्याच्या फवार्‍यामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहात रस्त्यावरील वाहने वाहत जाण्याची घटना घडली होती. तसेच लाखो लीटर पाणी वाया गेले होते. त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या अधिकारी वर्गाने या पाईपलाईनच्या लिकेजकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version