| अलिबाग | प्रतिनिधी |
शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र, अलिबागच्या वतीने रविवार, 14 मे रोजी, श्रीबाग येथील श्रीमती भारती दीनानाथ तरे सभागृहात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंंगरे व दंतरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी 60 ज्येष्ठांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.
शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र, अलिबागचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे यांनी उपस्थितांना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंंगरे व दंतरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय शिंदे यांचा परिचय करुन दिला. त्यानंतर डॉ. अनिल डोंगरे यांनी वृद्धत्वातील झोपेच्या समस्या या विषयी व्याख्यान दिले. तसेच स्लाईडशोच्या माध्यमातून समस्यांचे निराकरणाबाबतही माहिती दिली. दंतरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय शिंदे यांनी दातांची निगा या बाबत स्लाईडशोच्या माध्यमातून माहिती दिली आणि उपस्थित ज्येष्ठांच्या शंकांचे निरसनही केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे, प्रफुल्ल राऊत, जगदीश थळे, भारती दीनानाथ तरे, ॲड. मनोज पडते, शरद कोरडे, चारुशीला कोरडे यांनी खूप मेहनत घेतली. या कार्ययक्रमासाठी डॉ. प्रशांत जन्नावार, डॉ. सुरेश म्हात्रे, गजेंद्र दळी, उमाजी केळुसकर, आर.के. घरत, अजय घरत आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. प्रफुल्ल राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानून व्याख्यानाची सांगता केली.