। पनवेल । वार्ताहर ।
जनजागृती ग्राहक मंच रायगड शाखा पनवेल आणि के गो लिमये वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 9 जुलौ रोजी सायंकाळी 5 वाजता नीता सुर्वे मॅनेजिंग डायरेक्टर शाश्वत वेल्फेअर फाउंडेशन यांचे गृह निर्माण संस्था व्यवस्थापन व समस्या या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. सदर व्याख्यानाचे ठिकाण के गो लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय सभागृह ,पनवेल आहे. सबब या कार्यक्रमास श्रोत्यांनी आवर्जून उपस्थित राहून त्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या समस्यान बाबत मार्गदर्शन घ्यावे व आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे असे आवाहन वरील दोन्ही संस्थांच्या अध्यक्षांनी केले आहे.