विद्यार्थ्यांसाठी मतदार जागृतीविषयी व्याख्यान

| उरण | वार्ताहर |

उरण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागृती अभियान या विषयावर बुधवारी (दि. 13) व्याखान झाले. यावेळी नरेश मोकाशी, स्वीय पथक अधिकारी म्हणून उपस्थित होते. मोकाशी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मतदान हक्कांविषयी मार्गदर्शन केले.

दरम्यान, रुपेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून आजचा तरुण आणि त्याचा मतदान हक्क, मतदान हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार असून, त्याने तो बजावला पाहिजे, असे सांगितले. निर्मला घरत यांनी मतदार सेल्फीविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी आजच्या तरुणांनी मतदानाविषयी सजग व जागरूक राहून आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे व्यक्त केले. यावेळेस मी मतदान करणार म्हणून नवमतदारांकडून सह्यांची मोहीम राबविण्यात आली तसेच महाविद्यालयातील मतदार विद्यार्थ्यांचे सेल्फी घेऊन मतदान करण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.

कार्यक्रमाचे आभार प्रा. राम गोसावी, राष्ट्रीय सेवा योजना चेअरमन यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास महाले, प्रा. गजानन चव्हाण, प्रा. मयुरी मोहिते, प्रा. आचल बिनेदार, डॉ. झेलम झेंडे, डॉ. सुजाता पाटील उपस्थित होत्या. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version