पराग बोरसे यांचे आयर्लंडमध्ये व्याख्यान

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत येथील आंतरराष्ट्रीय खात्याचे चित्रकार पराग बोरसे यांच्या कर्तृत्वात आणखी भर पडली आहे. देश विदेशातील अनेक पुरस्कारांचे विजेते असलेले आणि जगातील अनेक सन्मान यांनी सन्मानीत करण्यात आले असून बोरसे यांचे व्याख्यान आयर्लंड देशातील डब्लिन महानगरात होणार आहे. भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि आयर्लंड देशाच्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव निमित्त भारत आयर्लंड मैत्री व्याख्यानमाला निमित्त व्याख्यान आयोजित केले आहे.

व्याख्यानमालेचा उद्देश दोन्ही देशातील नागरिकांमध्ये संवादाची भावना वाढवणे, सामाजिक-आर्थिक विकास, लोकशाही शासन आणि तंत्रज्ञान, कला,संस्कृती,नागरी समाजाचे तळागाळातील प्रेरणादायी कार्य या क्षेत्रातील सर्जनशीलता या विविध पैलूंमधील अनुभव आणि नवकल्पनांची देवाणघेवाण करणे हा आहे. या व्याख्यानमालेत कर्जत येथील जगप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांना भारतीय दूतावास तसेच डब्लिन आणि आयर्लंड यांनी कला आणि मानवी चेतना या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले आहे.

Exit mobile version