| पेण | प्रतिनिधी |
पावसाळयात कळत नकळत आजाराचा प्रादुर्भाव वाढतो आणि औषधांची व लॅब मध्ये तपासणी करण्याचे प्रमाण वाढत असते. कळत नकळत रायगडसह पेण मध्ये मोठया प्रमाणात बेकायदेशीर मेडीकल दुकान व लॅब उघडले गेले आहेत. मात्र याकडे ना आरोग्य यंत्रणेचे लक्ष ना अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागांमध्ये मोठया प्रमाणात मेडीकल दुकानं उघडली गेली आहेत. यांच्यावर लगाम लावण्याच्या दृष्टिने शासनाने नविन धोरण जाहीर केले असून राज्यामध्ये बेकायदेशीर मेडीकल दुकाने व लॅब यांच्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री यांनी अधिवेशनाच्या दरम्यात दिले आहेत. याच आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.