वसंतराव नाईक महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर

| कोर्लई | प्रतिनिधी |

मुरुड तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी.आर. तिवारी (क स्तर) यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉ. जी.डी. मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले.

सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी.आर.तिवारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना तळागाळातील माहिती व पारदर्शकता उपक्रमासाठी न्याय जागरूकता योजना 2025 बाबत समितीचे कार्य, जबाबदारी व राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व सुविधांबाबत माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांचे होणारे रॅगिंग, लैंगिक शोषण व अत्याचार इ. विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन केले. कायदेविषयक जनजागृती शिबीराचे प्रमुख वक्ते ॲड. डी.एन. पाटील, सचिव, वकील बार मुरुड यांनी, ॲड. फैसल जामदार यांनी तसेच ॲड. विनायक शेडगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. एस.एस. भैरगुंडे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. जी. डी. मुनेश्वर, सूत्रसंचालन डॉ. एस.एल. म्हात्रे तर दिवाणी न्यायालयाचे वरीष्ठ लिपिक मतिन अधिकारी यांनी आभार मानले.

Exit mobile version