चिरनेरमध्ये कायदेविषयक जनजागृती

। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुका विधी सेवा समिती तसेच उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर चिरनेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. उरणमधील क स्तरचे दिवाणी न्यायाधीश एन. एम. वाली आणि दुसरे सहदिवाणी न्यायाधीश पी. एन. पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक जनजागृती करण्यात आली.

राईटस ऑफ सीनिअर सिटिझन या विषयावर अ‍ॅड. केवल गावंड, राईट्स माफ मायनर या विषयावर अ‍ॅड. वृषाली पाटील, तर राईटस ऑफ फिमेल या विषयावर अ‍ॅड. डी. व्ही. नवाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजात शांतता व सुव्यवस्था कशी नांदेल. याविषयी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन एन. एम. वाली यांनी केले. यावेळी संतोष चिर्लेकर, महेश पवार, संजय पाटील, कृष्णा व्यापारी, मनिन चिर्लेकर, श्रीधर मोकल, शकुंतला चिर्लेकर, जयवंती गोंधळी, शंकुतला चिर्लेकर, चिरनेर गावचे नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version