श्रीवर्धनमध्ये कायदेविषयक जनजागृती

शिक्षेची भिती बाळगा – न्या. प्रतिक लंबे
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.2 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या विविध कायद्यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी, कायद्यांबद्दल जर काही अज्ञान असेल तर ते दूर व्हावे या हेतुने शुक्रवारी (दि.8) श्रीवर्धन नगर परिषद येथे कायदेविषयक जागृतीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या सुरूवातीला नगराध्यक्ष फैसल हुर्जुक यांनी श्रीवर्धनचे दिवाणी न्यायाधीश न्या.प्रतिक लंबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अ‍ॅड.आशिष वढावकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेत अटक आरोपींना दिलेल्या अधिकारांबाबत सविस्तर नियम सांगितले. नगराध्यक्ष फैसल हुर्जुक यांनी पोलिसांना सर्च वाॉरंटसंबंधीचे कोणते अधिकार असतात यासंबंधी काही शंका विचारल्या. आपल्या सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात न्या.प्रतिक लंबे यांनी कायद्याविषयीच्या अनेक बाबींचा परामर्श घेतला. या कार्यक्रमाला अ‍ॅड.वढावकर, अ‍ॅड.लाड, अ‍ॅड.पाटील, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, न्यायालयाचा स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अँड. संतोष सापटे यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version