कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड पंचायत समितीत मुरुड तालुका विधी सेवा समिती वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायाधीश घनःश्याम तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नागरीक, अल्पवयीन मुले व महिलांचे हक्क, महिलांच्या सुरक्षा व गोपनीयता, पिडीतांसाठी नुकसान भरपाई योजना, दुष्काळ पुर औद्योगिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांना शासकीय योजना या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी अ‍ॅड. डी.एन.पाटील यांनी जेष्ठ नागरीकांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केले. तर, अ‍ॅड. ए.ए. चोगले यांनी अल्पवयीन मुले व महिलांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, अ‍ॅड. एम.जे.तांबडकर यांनी पिडीतांसाठी नुकसान भरपाई योजनांबाबत माहिती दिली. या कायदेविषयक शिबीरात तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश घन:श्याम तिवारी, मुरुड वकील संघाचे सचिव अ‍ॅड.डी.एन. पाटील, अ‍ॅड. एम. जे. तांबडकर, अ‍ॅड. ए.ए. चोगले व अ‍ॅड. एम.एस. सतविडकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय शेडगे, पर्यवेक्षिका शुभांगी कोतवाल, विजया खेऊर, अंगणवाडी सेविका, त्यांच्या सहाय्यक, आशा वर्कर आदी.उपस्थित होते.

Exit mobile version