उरण शहरातील रस्त्यांचे भूमिपूजन

। जेएनपीटी । वार्ताहर ।
राज्य सरकारच्या एमएमआरडीएच्या निधीतून आणि उरण नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील सातरहाटी व हरिपांडव या अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण शुभारंभ कोजागिरी पौर्णिमा व ईद-ए-मिलादचे औचित्य साधून शहरातील ज्येष्ठ नागरिक अशोक पालकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
उरण नगर पालिका हद्दीतील सातरहाटी व हरिपांडव या दोन रस्त्याच्या काँक्रीटच्या रस्त्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून 25 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या कार्यक्रमाला आ.महेश बालदी, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा गट नेते रवि भोईर, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका प्रियांका पाटील, रजनी कोळी, नगरसेविका आशा शेलार, शहराध्यक्ष कौशिक शहा, हितेश शहा, निलेश पाटील, स्वप्निल मयेकर, सुरेश शेलार, राजू कदम, संपदा थळी, श्री गावदेवी देवी कन्स्ट्रक्शन तथा भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, निलेश पाटील, नगरसेवक व पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.

Exit mobile version