सुंदरराव मोरे महाविद्यालयात विधी साक्षरता

| पोलादपूर | वार्ताहर |

शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित चोळई येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रभाकर मोरे यांच्या जयंतीनिमित्त विधी साक्षरता आयोजित करण्यात आली होती. प्रमुख अतिथी म्हणून महाड येथील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश हर्षदा आदमाने यांनी विद्यार्थ्यांना स्वत:चे करिअर घडवण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रमाची आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन विभाग यांच्या विद्यमाने महाड पोलादपूर वकील संघटनेतर्फे युवा विद्यार्थ्यांमध्ये विविध महत्त्वपूर्ण कायदे, त्यांची अंमलबजावणी आणि विविध तरतुदी या संदर्भात जनजागृती करण्याच्या हेतूने सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर व उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे, ॲड.ए. ए. अंबरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विधी साक्षरता शिबिर महाविद्यालयात आयोजित करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल महाड दिवाणी न्यायालय व महाड पोलादपूर वकील संघाचे ॲॅड. संतोष काळे यांनी आभार मानले.

Exit mobile version