दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

| वेलिंग्टन | वृत्तसंस्था |

क्रिकेट चाहत्यांसाठी ही दु:खद बातमी न्यूझीलंडमधून आली आहे. न्यूझीलंडचा माजी लेगस्पिनर जॅक अलाबास्टर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. 1955 ते 1972 दरम्यान 21 कसोटी सामन्यामध्ये ते आपल्या देशासाठी खेळले, ज्यात त्यांनी 49 विकेट घेतल्या. या कालावधीत न्यूझीलंड संघाने 4 कसोटी सामने जिंकले होते, जॅक अलाबास्टर देखील या विजयी संघाचा एक भाग होता. त्यांनी 1955 मध्ये पाकिस्तानविरुद्ध डेब्यू सामना खेळला होता. जॅक यांनी 1955-56 मध्ये भारताला भेट दिली होती.

Exit mobile version