सत्ताधारी,विरोधक आक्रमक
चहापानावर बहिष्कार
मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवारी( 22 डिसेंबर)विधानभवन, मुंबई येथे सुरू होत आहे. अधिवेशनाच्यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आठवडाभरासाठी आमने,सामने येणार आहेत.सत्ताधार्यांकडून विविध विधेयके सादर केली जाणार आहे.तर राज्यातील एकूणच कारभारावरुन विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचे डावपेच आखले जात आहेत.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर बहीष्कार टाकत असल्याचं सांगितलं आहे. कमी काळाचं अधिवेशन घेऊन लोकशाहीला कुलुपबंद करण्याचा सरकारचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. त्यामुळे आता विधानसभेचं अधिवेशन देखील वादळी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी सभापती यांनी दिल्या. सोमवारी, 20 डिसेंबर रोजी एकूण 2678 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 8 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटीपीसीआर चाचणी विधान भवन प्रवेशासाठी बंधनकारक आहे.
या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव (समिती) डॉ. अनिल महाजन, उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव रविंद्र जगदाळे, पोलीस दल, वैद्यकीय विभाग, अग्निशमन यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह सर्व संबंधित
लोकशाहीला कुलुप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. पण महाराष्ट्र सरकारची मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही आणि रोखशाही सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते