| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नागावमध्ये मंगळवारी (दि.9) सकाळी बिबट्याने दोघांवर हल्ला केल्याची घटना घडली. यापैकी अमित नावाच्या तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
सतर्क रहा- हर्षदा मयेकर
नागावमध्ये बिबट्या आला असून त्याने दोघांवर हल्ला केला आहे. सध्या नागावमध्येच त्याचा वावर असून वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आम्ही सर्वांनीच त्याला पाहिले आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.






