बाहेगाव परिसरात बिबट्याची दहशत

वनविभागाकडून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

| कोलाड | प्रतिनिधी |

काही दिवसांपूर्वी उडदवणे ते बाहे या गावांच्या दरम्यान गावकऱ्यांना बिबट्या दिसून आला होता. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन शहानिशा केली. तपासा दरम्यान त्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. या पार्श्वभूमीवर वनविभाग, रोहा आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच बाहेगावात ‌‘बिबट्या वैरी नव्हे तर शेजारी’ या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमा दरम्यान बिबट्याचे वर्तन, त्याच्याशी सहजीवन कसे साधावे, तसेच सुरक्षिततेचे उपाय याविषयी माहिती देण्यात आली.

Exit mobile version