| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील बिबट्याची दहशत असल्याची चर्चा सुरु आहे. पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागाव परिसरामध्ये बिबट्याने काही मंडळींवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे संपूर्ण गाव व परिसर भीतीच्या छायेखाली असल्याचे बोलले जात आहे. नागाव मधील तीन व्यक्तींवर बिबट्याने हल्ला केल्या असून, दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
नागाव मध्ये बिबट्याची दहशत?
