अलिबागमध्ये थळ परिसरात बिबट्या…पहा व्हिडिओ

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील थळ परिसरात बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल तालुक्यातील वावंजे परिसरात बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितल्यानंतर त्यांना सावधानतेचा इशारा वन विभागाकडून देण्यात आला आहे.

ही सत्य घटना असल्यास अलिबागमध्ये बिबट्या येण्याची ही पहिली वेळ आहे. गेले तीन दिवस वन विभाग बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर तेथील कर्मचार्‍यांनी सांगितले. याबाबत वन विभागातील कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version