सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षेचे विद्यार्थ्यांना धडे

पोयनाड येथील नाना पाटील हायस्कूलमध्ये कार्यक्रम

| अलिबाग | प्रतिनिधी |

शालेयस्तरापासूनच विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व महिला सुरक्षेचे धडे मिळावे यासाठी पोयनाड येथील नाना पाटील हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रायगड पोलीस महिला विभाग भरोसा सेल, विधी व न्याय सल्लागार ॲड. गीता दर्शन म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व महिला सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शन केले. या गुन्ह्यांमुळे होणाऱ्या परिणामांची माहिती देखील सांगण्यात आली. वाढत्या सोशल मिडीयाच्या वापरामुळे सायबर गुन्हेगारी होण्याची भीती अधिक आहे. तसेच, महिला सुरक्षेचा देखील प्रश्न गंभीर आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी या गुन्ह्यांपासून दूर राहण्याबाबत काळजी कशी घ्यावी, याचे धडे गीता म्हात्रे यांनी दिले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सांगळे, पोयनाड पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेतील पोलीस कर्मचारी मेहेत्तर, सोनल कामठे, नाना पाटील हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रणदिवे, मुख्याध्यापक शशीकांत पाटील, शिक्षक व इतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Exit mobile version