विद्यार्थ्यांना आकाश कंदील बनविण्याचे धडे

78 वर्षीय अनंत कर्वे यांचा स्तुत्य उपक्रम

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ गावातील हस्तकला कलावंत आणि रेल्वेमधील निवृत्त अधिकारी अनंत कर्वे हे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दिवाळी सणाच्या आधी आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा आयोजित करीत असतात. कर्जत शहरातील विद्या विकास शाळेत तसेच वांगणी येथील विद्या विकास मंदिर शाळेत ही कार्यशाळा झाली. त्यात या दोन्ही शाळांच्या 110 विद्यार्थी यांनी सहभागी होत कागदाचा वापर करून अनेक प्रकारची आकाश कंदील बनविले.


अनंत कर्वे हे 78 वर्षीय कलावंत आपला छंद म्हणून या वयातदेखील आकाश कंदील बनविणे, टाकाऊपासून टिकाऊ तसेच किल्ले बनविणे यांच्या कार्यशाळा घेत असतात. दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. कर्जत शहरातील महिला मंडळाच्या विद्या विकास शाळेत त्यांनी 55 विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली. त्या ठिकाणी विद्यार्थ्यंसह शालेच्या मुख्याध्यापिका स्नेहा गाढे तसेच महिला मांडला संस्थेच्या उपाध्यक्ष वैदेही पुरोहित, सचिव मीना प्रभावळकर आदीदेखील विद्यार्थी बनून सहभागी झाले होते.


अनंत कर्वे यांनी वांगणी येथे विक्रोळी एज्युकेशन सोसायटीच्या विद्या विकास शाळेत देखील आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळत या शाळेतील 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यावेळी या शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा भोईर, शिक्षक निलेश धनगर, दशरथ निरगुडे आदीदेखील उपस्थित होते. या दोन्ही ठिकाणी अनंत कर्वे यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून केवळ कागदाचा वापर करून आकाश कंदील बनवून घेतले. पर्यावरणपूरक इको फ्रेंडली आकाश कंदील बनल्याने विद्यार्थी आणि पालकांनीदेखील आनंद व्यक्त केला.

Exit mobile version