पडझड झालेल्या ज्ञानमंदिरांतूनच ज्ञानाचे धडे

निधीअभावी रखडली दुरुस्ती; 21 कोटींचा निधी अपेक्षित, 455 शाळांची डागडुजी, 803 वर्ग खोल्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर

| रायगड | प्रतिनिधी |

शैक्षणिक वर्ष सुरु झाले असले तरी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची डागडुजी रखडलेली आहे. शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने तब्बल 455 शाळा आणि 803 वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे शाळा समित्यांकडून सादर झाले. प्रस्ताव सादर होऊन देखील निधी नसल्याने शाळांची आणि वर्गखोल्यांची डागडुजी करणे शिक्षण विभागाला शक्य झाले नाही. यामुळे आज विद्यार्थी पडझड झालेल्या शाळांमध्येच धडे गिरवत आहे. शिक्षण विभागाने शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन विभागाकडे निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. जिल्ह्यातील 405 शाळा आणि 803 वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी 20 कोटी 82 लाख 64 हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे.

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते पाचवी आणि पाचवी ते आठवी असे विभाग आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची आजची स्थिती बिकट आहे. तब्बल 405 शाळांची डागडुजी करणायची गरज निर्माण झाली आहे. तसे प्रस्ताव शाळा व्यवस्थापन समितीने रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविले आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यात 30 , कर्जत 41 , खालापूर 19 , महाड 57 , माणगाव 55 , म्हसळा 19 , मुरूड 17 , पनवेल 43 , पेण 47 , पोलादपूर 19 , रोहा 32 , श्रीवर्धन 14 , सुधागड 29 , तळा 23 आणि उरण तालुक्यातील 10 शाळांचा समावेश आहे. या शाळांच्या डागडुजीसाठी आवश्यक असणारा निधी शिक्षण विभागाकडे नाही .

रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्ग खोल्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक वर्गखोल्यांना तडे जाणे, भिंतीचे सिमेंट पडणे अशा प्रकारची अवस्था आहे. जिल्यातील प्रथानिक शाळांमधील 803 वर्ग खोल्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील 62 वर्गखोल्या , कर्जत 74 वर्गखोल्या , खालापूर 37 वर्गखोल्या , महाड 93 वर्गखोल्या , माणगाव 84 वर्गखोल्या , म्हसळा 34 वर्गखोल्या , मुरूड 38 वर्गखोल्या , पनवेल 97 वर्गखोल्या , पेण 75 वर्गखोल्या , पोलादपूर 31 वर्गखोल्या , रोहा 45 वर्गखोल्या , श्रीवर्धन 21 वर्गखोल्या , सुधागड 48 वर्गखोल्या , तळा 45 वर्गखोल्या आणि उरण तालुक्यातील 19 वर्गखोल्या शिक्षण विभगाला बांधाव्या लागणार आहेत.

तालुकावार अपेक्षित खर्च
जिल्ह्यातील 455 शाळा आणि 803 वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला 20 कोटी 82 लाख 64 हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे. यामध्ये शाळा आणि वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी अलिबाग तालुक्यासाठी 1 कोटी 29 लाख 3 हजार , कर्जत 2 कोटी 39 लाख , खालापूर 93 लाख , महाड 2 कोटी 74 लाख 99 हजार , माणगाव 1 कोटी 98 लाख 84 हजार , म्हसळा 74 लाख 14 हजार , मुरुड 69 लाख 43 हजार , पनवेल 1 कोटी 87 लाख , पेण 2 कोटी 48 लाख , पोलादपूर 1 कोटी 55 लाख , रोहा 1 कोटी 14 लाख 28 हजार , श्रीवर्धन 52 लाख 64 हजार , सुधागड 1 कोटी 11 लाख 58 हजार , तळा 94 लाख 47 हजार आणि उरण तालुक्यातील 41 लाख 24 हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे.

Exit mobile version