सुरक्षेसाठी कारखाना प्रतिनिधींना धडे

। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी असल्याने या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोप्राण फार्मा कारखान्यांनी पुढाकार घेत कारखान्यात अपघात टाळण्यासाठी कामगार व कर्मचारी वर्गासाठी सराव शिबिराचे आयोजन करुन कारखाना प्रतिनिधींना सुरक्षेविषयी धडे देण्यात आले. यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून आभासी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

कोप्राण फार्मा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या सुरक्षा शिबिरासाठी सुरक्षा कमिटीचे उपाध्यक्ष अंकुश खराडे, संजय गोविटकर, कोप्राण कंपनीचे के.जी. शर्मा, डॉ. वल्लभ, अविनाश म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी टाटा स्टील सावरोली, उत्तम स्टील, महिंद्रा सानियो, मंगलम ऑर्गनिक, कमानी ऑइल, पारले फूड्स, गोदरेज अँड बॉइज यासह अन्य कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रमुख वक्ते संजय गोविटकर यांनी आभासी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.

Exit mobile version