अन्यायाविरोधात पुन्हा लढा देऊ या: अनिल पाटील

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आपल्या महाराष्ट्रातील कोकणातील एक मराठी तरुण दिल्लीत जाऊन असंख्य तरुणांना एकत्र करतो. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतो, ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि लाठीहल्ल्याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी अलिबागमध्ये बैठक आयोजित केली आहे.

तरुणांना न्याय मिळावा, म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग नव्हे, तर संपुर्ण रायगड जिल्ह्याचे नेतृत्व स्विकारले आहे. भावी, उद्योजक, अधिकारी, इंजिनिअर बनणाऱ्यांना बेचिराख केले जात आहे. ही गोष्ट गंभीर आहे. हे भाजपचे सरकार फक्त पक्षांतर करण्यामध्ये अधिक मग्न आहे. मात्र, येथील तरुणांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, ही चिंताजनक बाब आहे. सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे तरुणांच्या आंदोलनात दिल्लीमध्ये सक्रीय सहभाग घेण्याची गरज आहे. चित्रलेखा पाटील तरुणांच्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यांंचे हात मजबूत करण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी गरज आहे. उठा जागे व्हा, राष्ट्रध्वज घेऊन अन्यायाविरोधात पुन्हा लढा देऊ या असे आवाहन शेकापचे अनिल पाटील यांनी केले.

Exit mobile version