। कोर्लई । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून लौकिक मिळवलेल्या मजगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे नव्या शैक्षणिक वर्षात स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला.
शाळेत पहिल्यांदाच नव्याने पाऊल ठेवणार्या बालकांच्या मनातली भीती दूर व्हावी, त्यांनी शाळेत रूळावे व आनंदाने शैक्षणिक कृती कराव्यात. यासाठी हा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवला जात असल्याचे मुख्याध्यापक हेमंत गोयजी यांनी सांगितले. या प्रवेशोत्सवात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यंदा शासनातर्फे पाठ्यपुस्तके गणवेश याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक हेमकांत गोयजी यांनी उत्तम प्रकारे केले होते.
यावेळी मनीषा वाघरे, हर्षा नांदगावकर, प्रमिला फुंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निखिल मानाजी उपाध्यक्ष उमेश कोंडाजी, माजी उपसरपंच योगेंद्र गोयजी तसेच रूपेश अंबाजी, रूपेश पाके आदी सदस्य उपस्थित होते.