मिशन कवचकुंडल अभियान यशस्वी करूया

। कर्जत । वार्ताहर ।
शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात, शहरात जास्तीत जास्त लसिकरण शिबिरे आयोजित करून शासनाचे मिशन कवचकुंडल अभियान यशस्वी करू या असे आवाहन कर्जतचे प्रांत अधिकारी अजित नैराळे यांनी कर्जत येथे महिला लसीकरण शिबिरात केले.
शासनाने 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत कोव्हीड -19 लसीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून 11 ऑक्टोबर रोजी मिशन कवच कुंडल अभियान अंतर्गत येथील रॉयल गार्डनच्या सभागृहात इनरव्हील क्लब कर्जत आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी तहसिलदार विक्रम देशमुख, नायब तहसिलदार सुधाकर राठोड, कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे, रविंद्र माने, उमेश राऊत, सुदाम म्हसे, मोनिका बडेकर, प्राची चौडीए, उत्तरा वैद्य, पल्लवी सावंत, सरस्वती चौधरी, शिल्पा दगडे, ज्योत्स्ना शिंदे, सुलोचना गायकवाड, शीला गुप्ता, वनिता सोनी उपस्थित होत्या.

Exit mobile version