नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे
कोरोनानंतर दोन मेळावे घेणार
नवीन तरुणांच्या हाती गावातील सुत्र द्या
। अलिबाग । भारत रांजणकर ।
पक्षाचे रायगडमध्ये झालेले नुकसान तर भरुन काढूच त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये वेगळया तर्हेचे अस्तित्व दाखवून देऊ. आपले कोणी मित्र होऊ शकत नाही. आपले विचार वेगळे आहेत. आपली बांधीलकी वेगळी आहे. आपली बांधीलकी गरीबांबरोबर आहे, शेतकर्यांबरोबर आहे श्रमीकांबरोबर आहे. काम करणार्यांवर आहे. त्यांच्या बरोबरच आपल्याला पुढे जायचे आहे. ज्या पद्धतीचे काम आज करत आहात तेच काम पुढे न्यायचे आहे. नवीन तरुणांच्या हाती गावातील सुत्र द्या. गावातले सगळे आपले नेते नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कोरोना, चक्रीवादळ आणि आता अतिवृष्टीतदेखील शेतकरी कामगार पक्षाच्या बहाद्दर कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. शेतकरी कष्टकरी जनतसोबत असलेली पक्षाची बांधीलकी कायम राखलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. भविष्यात येणार्या नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाचा 74 वा वर्धापन दिन साधेपणाने आज साजरा करण्यात आला. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, अलिबागच्या उपनगराध्यक्षा अॅड मानसी म्हात्रे, तालुका चिटणीस अनिल पाटील आदी उपस्थित होते.
आबासाहेबांनी कधी आयुष्यात कधी तडजोड केली नाही. त्यांनी अन्नत्याग करुन आपले जिवन संपवले गेली पधरा दिवस कुठलेही अन्न घेतले नाही. त्यांचे असे म्हणणे होते. 95 वर्षांनंतर त्यांना ऐकायला येत नव्हते त्यांना दिसत सुद्धा नव्हतेे. मी आयुष्यात भरपूर काम केले. आणि आता या वयामध्ये कुठलेच काम करु शकत नाही. त्यामुळे
मी तीनवेळा जाऊन भेटलो शेवटपर्यंत आपण प्रयत्न केले. पण माणसाचा शेवट हा ठरलेला आहे. त्यामुळे घट्ट मन करुन शेवटच्या दोन दिवस तीथे होतो.
गणपतराव देशमुख गेले असताना दुःखद पार्श्वभुमीवर आपण वर्धापन दिन साजरा करीत आहोत. गेल्या वर्षी देखील वर्धापनदिन साजरा करता आला नाही त्याची देखील कार्यकर्त्यांना खंत आहे. यावर्षी देखील खंत आहेच. पुण्याला वर्धापनदिन साजरा करणार होतो. पण कोरोनामुळे करता आला नाही.
कोरोना काळात जे काम शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकाला मदत करण्याचे काम केल्याबद्दल माझ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
ज्या पद्धतीचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन वर्षे केलेले आहे. त्यामुळे एक वेगळी आत्मीयता दिसून आली आहे. शेवटी शेकापक्षच काम करतो हे आपण दाखवून दिले आहे. कोणाला न सांगता आवाहन न करता हे काम चांगल्या प्रकारे केलेले आहे. शेकापक्षाचे कार्यकर्ते कधीच खचून जात नाही. पराभवाला आपण कधीच भीत नाही. आजच्या वर्धापनदिनानिमितीत वेगळा संदेश द्यायची इच्छा होती.
आ. जयंत पाटील यावेळी म्हणाले की, जिल्ह्याचा अखंड मेळावा झाला असता तर वेगळया तर्हेने पुढली वाटचाल मांडणार होतो. दक्षिण आणि उत्तर रायगडात दोन वेगवेगळे मेळावे घेऊन आपले धोरण ठरवायचे आहे. अलिबाग तालुक्यात पंचायतीच्या निवडणूकी सर्वाधिक जागा आपण जिंकल्या. लोकांना बदल हवा होता. लोकांनी बदल करुन बघितला.
आपली मते कधीच कमी झाली नाहीत आहेत ती आहेत पाच हजार मते वाढली आहेत. सर्व लोक एकत्र आली आपण बेसावध राह्यलो. त्याचा प्रचार केला. आपली ताकद पक्षाच्या कार्यकर्ते आहेत त्यावरच आपण काम करत आहोत. जिल्हात कोण आले आणि गेले काही फरक पडत नाही. मंत्री येता आणि जातात पैसे काय येत नाहीत. वादळा झालेल्या झाडांचे नुकसान झाले दहा पंधरा वर्षे ती झाडे उभी रहायला जातील मात्र त्याचा एकही रुपया अपेक्षित पद्धतीने मिळालेला नाही.
जे काम केलेले नाही त्या पद्धतीचे काम आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पुन्हा करायचे आहे. यावेळी सर्वप्रथम नगरपालिका, मागून जिल्हा परिषदेच्या निवडणूका येत आहेत. तालुक्याची मिटींग घेणार. कार्यकर्तयांना सैल सोडणार नाही. मला खात्री आहे माझ्यापेक्षा तुमच्या मनात जास्त चिड आहे. तुमच्या मनामध्ये खंत आहे ती नक्कीच भरु काढू. रायगडमध्ये तर भरुन काढूच महाराष्ट्रामध्ये वेगळया तर्हेचे अस्तित्व दाखवून देऊ. आपले कोणी मित्र होऊ शकत नाही. आपले विचार वेगळे आहेत. आपली बांधीलकी वेगळी आहे. आपली बांधीलकी गरीबांबरोबर आहे, शेतकर्यांबरोबर आहे श्रमीकांबरोबर आहे. काम करणार्यांवर आहे. त्यांच्या बरोबरच आपल्याला पुढे जायचे आहे. ज्या पद्धतीचे काम आज करत आहात तेच काम पुढे न्यायचे आहे. नवीन तरुणांच्या हाती गावातील सुत्र द्या. गावातले सगळे आपले नेते नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करा.
पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून सोशल मिडीयाचे काम वेगळी भुमीका पुरोगामी संघटनेमध्ये 30 वर्षावरील पदाधिकारी ठेवायचे नाहीत. सोशल मिडियामुळे देखील आपल्याला फटका बसला. खोटे नाटे पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. चित्रलेखा पाटील यांनी सोशल मिडियावर जास्त लक्ष केंद्रीत केले. गावोगावी प्रयत्न सुरु आहेत. आपले दोनशे अडिचशे कार्यकर्ते सोशल मिडीयावर काम करत आहेत त्याचा व्यापक परिणाम दिसेल.
पक्षाचे विचार, धोरण पक्षाचे तत्वज्ञान. ज्या तत्वज्ञानाने 74 वर्षे महाराष्ट्रात करीत आहोत. ते सारे मनावर बिंबवावे लागेल. त्यामिनमितीत्तान गावोगावी पुरोगामी युवक संघटना आणि सोशल मिडीयावर बदल करा. जिल्हा पातळीवर पण आपण बदल करायला मागतो आहोत. परंतू आपला मेळावा होऊ शकत नाही. जिल्हा चिटणीस मंडळाची बैठक देखील होऊ शकत नाही.
नवीन तरुणांनी एकत्र येत व्यापक असे संघटन आपल्याला उभे करायचे आहे. मला खात्री आहे. मी 66 वर्षांचा झालो असलो तरी मला 40 वर्षाचाच असल्याचे वाटते. त्या पद्धतीचे काम पुढील काळात आपल्याला करायचे आहे. पुर्ववत असणारे संघटन अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करायचे आहे.
विधीमंडळ हे वेगळया पद्धतीची ताकद आहे. दत्ता पाटील, मीनाक्षी पाटील यांच्याकडे अनेकजण मार्गदर्शन घ्यायचे. त्या जोरावर व्यापक नाते आपण तयार केले. बोडणीच्या प्रश्नावर पाय बरा नसताना कामाची पुर्तता करायला भाग पाडले. विधीमंडळात आपण चांगले अभ्यासपूर्ण बोललो. विधीमंडळात पुर्ण वेळ उपस्थित राहीलो. त्याच्या जिवावर आपण संपूर्ण विकास करु शकलो.
अलिबाग शहरामध्ये आमदार म्हणून निधी आणला. या चेहर्याचा चेंढर्यामध्ये प्रत्येक गल्लीत आपण काम केले. संपूर्ण विकास आपण आमदार म्हणून काम केले. शहराचा विकास आमदार म्हणून आपण केलेला आहे. आणी पण आमदारकीला आपल्याला मतं कमी पडली, लोकसभेला मतं कमी. याचा विचार करायला हवा याचे विश्लेषण करण्याची गरज आहे. आमदार म्हणून काम केले आणि आमदारकील आपण मत न देता फक्त नगरपालिकेला देता हे चुकीचे आहे. याचे पण प्रबोधन करावे लागेल. याची जाणीव करुन द्यावी लागेल. नवीन कार्यकर्त्याला मददाम वेगळया तर्हेेने शुभेच्छा देतोय. हा असलेला कष्टकर्यांचा लाल बावटा 74 वर्षे फडकवत ठेवलेला आहे. तो आपण तुमच्या हाती देत आहोत. तो त्याच निष्ठेने त्याच प्रामाणिक आणि त्याच त्वेषाने काम करावे.
चर्चात्मक एक दिवसाची बैठक घेऊ. चर्चा करुन कोणाचे चुकले याची चर्चा करु
आपला दोन वेळा पराभव झाला होता. पण आपण पराभवाने खचलो नाही. मीनाक्षी पाटील यांना आपण 25 हजाराने पुन्हा जिंकून आणले.
आपण ज्याला ज्याला मदत केली, त्यांनी आपल्याला मदत केली नाही. आपली ताकद आपल्याच मनगटात आहे. त्याच मनटाच्या जोरावर पुन्हा आपल्याला उभे रहायचे आहे. मला खात्री आहे ज्या पद्धतीचे तरुण कार्यकर्ते सोबत येतात तेव्हा आनंद वाटतो अजुन पन्नास वर्षे आपले राजकारण असेच सुरु राहील. आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीचे काम केलेत. कोरोना वादळात केलेले काम खालच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. त्याचां गौरव करताना मला अभिमान वाटतो. आता पुढची वाटचाल आपली चांगली होईल. ज्या चुका केल्या, त्याबाबत व्यापक बैठक विभागावार घेऊन निश्चितपणे वेगळे काम तालुका पातळीवर करु.
उद्याची वाटचाल आपले भवितव्य उज्वल राहणार आहे. कारण आपला विचार एक आहे. आपण आपला विचार कधीच सोडला नाही. म्हणून आज गणपतराव यांचा गौरव करताना पंतप्रधान, राज्यपाल, देशपातळीवरील नेत्यांनी गौरव केला. हा गौरव फक्त गणपतरावांचा नाही तर शेकापक्षाच्या प्रत्येक एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन ठेवलेले संबंध असे कायम ठेवायचे आहेत. सुरुवातीला शेकापक्षाच्या विचारांच्या मशालीचे प्रज्वलन जेष्ठ नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी केले. तर त्यांच्या हस्ते लाल बावटयाचे ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमात दिवंगत नेते माजी मंत्री गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मीनाक्षी ताई
जेष्ठ नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी आपल्या भाषणात दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव यांच्या आठवणी सांगत माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली. राज्याचे बजेट थांबविण्याची ताकद फक्त त्यांच्यात होती. पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे कार्यकर्त्यांसाठी पर्वणी असते. मात्र आबांच्या निधनाच्या दुःखाची झालर या वर्धापनदिनाला आहे. पक्षाचे भिष्माचार्य कुठलाही गाजावाजा न करता जनतेच्या प्रश्नासाठी झटत होता. मीनाक्षी पाटील राजकारणात असल्याचे श्रेय माझ्या वडिल, काकांबरोबरच आबांना मी देईन असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमुद केले.