चोंढी येथे ‘अंदाजपत्रकावर बोलू काही’ व्याख्यान

| अलिबाग | प्रतिनिधी |
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 14 मार्च रोजी ‘अंदाजपत्रकावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे व्याख्याते सहा. प्रा. चिंतन पोतदार यांनी अंदाजपत्रकावर उत्कृष्ट अशी माहिती दिली. तसेच अंदाजपत्रकातील सप्तर्षी म्हणजे महत्त्वाची अशी सात प्राधान्य क्षेत्र याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच 2023-24 च्या अंदाजपत्रकातील विविध क्षेत्रांचा उत्पन्न खर्चाचा वाटा याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.

यावर्षी शासनाने अंदाजपत्रकावर दिलेला भर याविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्याचबरोबर राज्यशास्त्र विभागप्रमुख सहा. प्रा. हर्शदा पूनकर यांनीदेखील स्पर्धा परीक्षांच्यासंदर्भात अंदाजपत्रकाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. प्रा. लिना पाटील यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये अंदाजपत्रकाचा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रा. लिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हर्शदा पूनकर यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा दळवी आणि आभार प्रदर्शन मंदार पाटील यांनी केले.

Exit mobile version