खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला जीवदान

खोपोलीच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमची कामगीरी
| खोपोली | वार्ताहर |
खोपोली शिळफाटा येथे खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे पिल्लू पडल्याचा कॉल आला. त्याला वाचविण्यासाठी अमोल ठकेकर आणि गुरुनाथ साठेलकर यांनी खोल विहरित उतरून प्रयत्न करण्याच्या तयारीला लागले.

तोवर अमोल कदम स्पॉट वर हजर झाले, त्यांनी मोहन केदार, गुरुनाथ साठेलकर आणि अजय निषाद यांच्या मदतीने त्या भेदरलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर काढून त्याच्या आईच्या ताब्यात दिले. बाहेर आलेले पिल्लू आईला बिलगले आणि जणूकाही त्या कुटुंबाने जल्लोष केला. त्या पिल्लाची आई आणि त्याची भावंडं विहिरीच्या शेजारी बसून या आणीबाणीच्या प्रसंगी कोणीतरी प्राणी मित्र वाचवायला येईल याची वाट पाहत असल्याचा भास झाला.

या बचाव अभियानात सहभागी झालेल्या मोहन केदार या प्राणी मित्राचा आज वाढदिवस होता आणि त्यांनी तो अश्या पध्दतीने साजरा केला.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एका मुक्या जीवाला वाचविण्याची कामगीरी केली त्याबद्दल टीमचे कौतुक होत आहे.

Exit mobile version