अजगराच्या पिल्लाला जीवदान

। कोर्लई । वार्ताहर ।
मुरूड-डोंगरी येथे स्वामी समर्थ मठात दीड फुटी अजगराचे पिल्लू आढळून आले. त्याला सर्पमित्र संदीप घरत यांनी आपल्या कौशल्याने सुरक्षितपणे पकडून वनविभागाच्या सहकार्याने जवळील जंगलात सोडून जीवदान दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

मुरुडजवळील डोंगरी येथे असलेल्या स्वामी समर्थ मठात सोमवारी सकाळच्या वेळेत सर्प असल्याचे आढळून आले असता ग्रामस्थ मनू मसाळ यांनी सर्पमित्र संदीप घरत यांना कळविले. संदीप घरत यांनी क्षणाचा विलंब न करता डोंगरी येथे स्वामी समर्थ मठात येऊन दीड फुटी अजगराच्या पिल्लाला पकडून वनविभागाच्या सहकार्याने जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून दिले. याबद्दल संदीप घरत यांचे कौतुक होत आहे. जर अशा प्रकारे सर्प आढळून आल्यास नजीकच्या वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या मुक्या प्राण्यांना मारु नये, असे आवाहन सर्पमित्र संदीप घरत यांनी केले आहे.

Exit mobile version