अलिबाग शहरातील जनजीवन विस्कळीत

| अलिबाग | वार्ताहर |


मुसळधार पावसामुळे अलिबाग शहरातील पेट्रोल पंप, बायपास मार्ग पाण्याखाली गेला होता. यातून वाहने चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. मुसळधार पडणारा पाऊस आणि हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टी च्या इशार्‍यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली होती. यामुळे अलिबाग मधील अरुण कुमार हायस्कूल बंद होत्या.


बामणगाव येथील भगत यांच्या घरावर तसेच गोठ्यावर पिंपळाचे मोठे झाड पडले. यात गोठ्याचे नुकसान झाले असून गोठ्यातील जनावरे देखील जखमी झाले आहेत. तसेच, येथील शेतावर जाणारा लोखंडी पूल ही वाहून गेला आहे.


खंडाळे येथील माजी सरपंच संतोष गुरव यांच्या शेतीचे नुकसान.

Exit mobile version