नदीत पडलेल्या तरुणाला जीवदान

। पुणे । प्रतिनिधी ।

छत्रपती शिवाजी पुलाजवळ नदीत पडलेल्या एका तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवून त्याला जीवदान दिले आहे. सोमनाथ निशाद असे घटनेतील तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशतील आहे. छत्रपती शिवाजी पुलाजवळ नदीत एक जण पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून कसबा अग्निशमन केंद्राला कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लगेचच दोरी आणि लाईफ जॅकेटचा वापर करून तरुणास सुखरूप बाहेर काढले.

Exit mobile version