लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा एक हजार झाडे लावण्याचा संकल्प

| कर्जत | प्रतिनिधी |
वाढते तापमान बदलते हवामान आणि औद्योगिकीकरणामुळे वाढत असलेले प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण म्हणून दिन साजरा केला जात आहे. या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट जागृती प्रकल्प तिवरे येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी लाईट ऑफ लाईट ट्रस्टचे रमेश दासवाणी (सी.ई.ओ.), कमल दमानिया (सी.ओ.ओ.), गौतम कनोजे (सहाय्यक प्रकल्प अधिकारी), कन्हैया सोमणे (कृषी अधिकारी), विद्यानंद ओव्हाळ (पी.आर.ओ.), राजेश भोईर, नीता बडेकर, तानाजी मिणमिणे, सूरज आगिवले, दशरथ नाईक, श्रुतिका पाटील, भगवान ठाकरे, महेंद्र श्रीखंडे आदी उपस्थित होते.
 

लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जागृती प्रकल्पांतर्गत गेल्या अकरा वर्षांपासून पर्यावरण संवर्धन कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिनी एका महिन्यांमध्ये एक हजार झाडांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ही झाडे कर्जत तिवरे येथील जागृती प्रकल्पाच्या मोकळ्या जागेमध्ये लावून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. या झाडांमध्ये पेरू, काजू, चिंच, जांभूळ, आवळा, सीताफळ, गुलमोहर, काशीद, आकाशिया आणि आपटा या प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत त्यांची सुरुवात जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने करण्यात आली.

जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने ‘एक झाड लावा आणि पर्यावरणाला हातभार लावा’ ही मोहीम सुरू केली असून, 15 जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेत आपण सर्व जण सहभागी होऊया, असे आवाहन जागृती प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Exit mobile version