४८ तासात जिल्हयात पावसाचा इशारा; कर्जतमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

दि.09 जून 2022 रोजी जारी करण्यात आलेल्या हवामानाच्या इशाऱ्यानुसार पुढील ४८ तासांच्या कालावधीमध्ये रायगड जिल्हयामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट आणि 30-40 किमी प्रति तास वेगाच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कर्जतमध्ये मुसळधार पावसाने पहिली हजेरी लावली असून सर्वत्र गारवा पसरला आहे.

या काळामध्ये नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी. हवामान विभागाच्या “दामिनी” ॲपचा वापर करून वीज पडण्याची शक्यता असलेल्या भागापासून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

कर्जतमध्ये कोसळणारा मुसळधार पाऊस

आपत्कालीन परिस्थितीमध्ये जवळच्या तहसील कार्यालयास किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. कर्जतकरांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच आवश्यकता असल्यास नियंत्रण कक्षाशी ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Exit mobile version