रेल्वे स्थानकातील सिंह पर्यटकांचे आकर्षण

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान रेल्वे स्थानकात पर्यटकांचे आकर्षण ठरावे यासाठी लोखंडी तारांनी साकारलेला सिंह उभारलेला आहे. त्या सिंहाच्या प्रतिकृतीला रंगवण्यात आले असून पर्यटकांसाठी त्या सिंहासोबत फोटो काढणे हे देखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मध्य रेल्वेच्या महत्वाच्या रेल्वे स्थानकात अशा काही प्रतिकृती मध्य रेल्वे प्रशासनाकडून बनविण्यात आल्या आहेत.

मिनीट्रेन इंजिनमुळे पर्यटकांचे माथेरान स्थानकातील आकर्षण वाढले असून आता पर्यटकांच्या आकर्षणाचा आणखी एक भाग स्थानकात उभारण्यात आलेले सिंह ठरत आहे. लोखंडी तारांपासून सिंहाची प्रतिकृती साकारण्यात आली असून साधारण साडेचार फूट लांब आणि साडेतीन फूट उंच अशी सिंहाची प्रतिकृती पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. त्या सिंहाच्या प्रतिकृतीला मोरचूद (कॉपर) रंगाने रंगवण्यात आले असून त्यामुळे त्या सिंहाचा डोलदार पणा आणखी उठून दिसत आहे.

Exit mobile version