उद्यापासून लायन्स अलिबाग फेस्टिवल

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबागमध्ये उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व अलिबागकरांना उत्तमोत्तम विविध वस्तू एकाच छताखाली ठेवण्यासाठी सुरु झालेला अलिबाग परिसरातील पहिलावहिला लायन्स अलिबाग फेस्टीव्हल, बुधवार 25 ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये अलिबाग समुद्र किनारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे इतर स्टॉल्स बरोबर पनवेल येथील सुप्रसिद्ध पटेल ज्वेलर्स यांच्या विन्यपूर्ण विविध डिझाईन्सचे सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या प्रदर्शन व विक्री, सॉलीटीयर इव्हेंट्स यांच्या माध्यमातून नामांकित चारचाकी व दुचाकी गाड्यांचे प्रदर्शन व विक्री अलिबागकरांसाठी उपलब्ध होणार आहे.

फेस्टीवलचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत, विजय राजू, मुकेश तनेजा, अमरचंद शर्मा, मनिष लडगे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व सांगता समारंभ आ. जयंत पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे. तसेच फेस्टीवलला खा. सुनिल तटकरे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, राजिप माजी अध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, राजिमसचे सीईओ मंदार वर्तक, जिप माजी सदस्या चित्रा पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह चित्रलेखा पाटील आदी मान्यवर भेट देणार आहेत.

Exit mobile version