लायन्स क्लब रेटिना तपासणी शिबिर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

लायन्स क्लब व लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग आणि आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम थळ यांच्यावतीने फोरमचा वर्धापन दिन आणि डॉक्टर्स डेच्या निमित्ताने सोमवारी (दि.1) रेटिना तपासणी शिबिराचे आयोजन आरसीएफ वसाहतमधील कम्युनिटी हॉलमध्ये करण्यात आले होते.

आरसीएफ थळ सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची संघटनेद्वारा संस्थेच्या सभासद पती-पत्नी यांची वयोमानानुसार डोळ्यांच्या पडद्याची होणारी झीज तपासणीसाठी लायन्स क्लब अलिबागद्वारा शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी 240 जणांची रेटिना तसेच उंची, वजन, रक्त दाब व रँडम शुगर तपासणी करण्यात आली. डोळ्यांच्या पडद्याच्या तपासणीसाठी रेटिना स्पेशलिस्ट डॉ. अश्‍विनी करंजकर तसेच डॉ. शुभदा कुडतलकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

यावेळी लायन्स क्लब व लायन्स हेल्थ फाउंडेशनच्यावतीने द्वितीय प्रांतपाल प्रवीण सरनाईक, अध्यक्ष संजय पाटील, सचिव प्रदीप नाईक, नवनिर्वाचित अध्यक्षा अ‍ॅड. गौरी म्हात्रे, लायन्स हेल्थ फाउंडेशन उपाध्यक्ष नितीन अधिकारी, महेंद्र पाटील, प्रकाश देशमुख, भगवान मालपाणी, अ‍ॅड.गिरीश म्हात्रे, संतोष पाटील, नयन कवळे, अभिजित आमले व पदाधिकारी यांनी या शिबिरासाठी खूप परिश्रम घेतले. या प्रसंगी आरसीएफचे कार्यपालक निदेशक अनिरुद्ध खाडीलकर यांनी शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी महाप्रबंधक हरळीकर, भालचंद्र देशपांडे, प्रदीप नाईक, प्रविण सरनाईक, राकेश कवळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version