। कोलाड । वार्ताहर ।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आठवड्यांपासून सुरु असलेले आरोप, प्रत्यारोप, बैठका, रोड शो, जाहीर सभा या सर्वांना ब्रेक लागला असून याबरोबरच आता चार दिवसांसाठी ड्राय डे म्हणून पाळण्यात येणार आहे. सोमवारी (दि.18) प्रचार संपल्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून मद्य विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी मतदानाच्या दिवशी म्हणजेच बुधवार दि.20 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.23) सायंकाळी 6 वाजेपर्यंत मद्य विक्री बंदी असणार आहे. या कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर अथवा एखाद्या व्यक्तीकडे विनापरवाना मद्य विक्रीसाठा आढळून आला तर त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे तळीरामांचे वांदे झाले असल्याचे बोलले जात आहे.