उरण-जासई येथे 76 लाखांचे मद्य पकडले

| उरण | वार्ताहर |

तालुक्यातील जासई येथे दिव-दमण येथून तीन ट्रेलर ट्रकमधून आणलेले 76 लाखांचे मद्य उरण राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले आहे. या प्रकरणी हरिश्चंद्र गायकवाड (पाटोदा बीड), मोहम्मद वसीर (उत्तरप्रदेश), देविदास तांदळे (आष्टी बीड) अशा तिघांना अटक केलेल्यांची नावे आहेत. बारा चाकी ट्रेलर आणि तीन कंटेनर जप्त करण्यात आले आहेत.

जेएनपीटी परिसरात दिव-दमण येथून परदेशी मद्य येणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह उरण येथे विविध ठिकाणी गस्त ठेवली होती. त्यांना रात्रीच्या सुमारास जासई-उरण येथे तीन संशयीत ट्रेलर आढळून आले, त्यांची तपासणी केली असता सिग्नेचर व्हिस्कीचे 2280 बॉक्स तर मॅकेडॉवेल्स व्हिस्कीचे 375 बॉक्स एवढा माल जप्त करण्यात आला. सदर मद्याचा पुरवठा कोणाकडे जाणार करण्यात येणार होता. याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे.

सहआयुक्त सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त यतीन सावंत, ठाणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, रायगडचे अधिक्षक आर.आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली उरणचे दुय्यम निरीक्षक प्रवीण माने, सुहास दळवी यांनी ही कारवाई केली.

Exit mobile version