| रायगड | वार्ताहर |
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची दुसर्या फेरीची निवड यादी जाहीर झाली आहे. या फेरीत 51 हजार 99 विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार असून 28 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान दुसर्या यादीचे प्रवेश होणार आहेत.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.







