आरडीसी कोलाड शाखेत साक्षरता मेळावा

| खांब-रोहा | वार्ताहर |
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि रा.जि.सहकारी मध्यवर्ती बँक अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर.डी.सी.बँक कोलाड शाखेत महिला आर्थिक साक्षरता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. मेळाव्यात शाखा परिसरातील 15 बचत गटातील जवळपास 75 महिलावर्ग सहभागी झाल्या होत्या. शाखाधिकारी भावना सरफळे यांनी स्वागत केले. त्यानंतर राबविल्या जाणार्‍या सर्व आर्थिक योजना व सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर योजनांमध्ये बचत गटाबाबत वैयक्तिक ठेवी व कर्ज योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना,अटल पेन्शन योजना आदींबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच होम सेव्हिंग्ज योजना सहभागी न झालेल्या महिलांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.अल्प बचत योजना, विविध ठेव योजना,आवर्त योजना आदी ठेवींच्या माध्यमातून भविष्यासाठी व दैनंदिन व्यवहारासाठी कशी बचत होऊ शकते याबाबतची माहिती देऊन स्वरोजगार कर्ज योजनेतंर्गत रू.50 हजार ते रू.5 लाख पर्यंत चालू करण्यात आलेल्या कर्ज योजनेची माहिती देऊन या योजनेचाही लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.शेवटी संक्रांत सणाचे पार्श्‍वभूमीवर हळदीकुंकवाचे वाण, तीळगुळ, गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन उपस्थित सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version