आदिवासी क्रिकेट स्पर्धेत लिटिल स्टार धारोळा संघ विजयी

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मार्गाची वाडी येथे सुधाकर घारे फ्रेंडशिप नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील लिटिल स्टार धारोळ संघाने जिंकली.क्रीडा क्षेत्रामध्ये आदिवासी समाजातील युवकांना संधी मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून फेंडशिप नाईट क्रिकेट स्पर्धा भरवली होती.

फ्रेंडशिप इलेव्हन खांडस कशेळे विभाग हरिचंद्र बांगारे हेमंत खंडवी यांच्या सहकार्याने भव्य नाईट क्रिकेटचे रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य सभापती चषकचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग नोंदविला होता. चार दिवस ग्रामीण टेनिस क्रिकेटचे मर्यादित षटकांचे सामने खेळविण्यात आले. या क्रिकेट सामन्यात लिटिल स्टार धारोळा संघाने प्रथम क्रमांक मिळवत सुधाकर घारे चषकाचे मानकरी ठरला.स्पर्धेत विजेते प्रथम क्रमांक लिटील स्टार धारोळ संघाने पटकावत एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले.

तर उपविजेता ठरलेल्या अंभेरपाडा संघाला 50 हजारांचे आणि तृतीय क्रमांक खालापूर तालुक्यातील भिलवले संघाने मिळवत 25 हजार रुपये तसेच चतुर्थ क्रमांक बांगारवाडी 25 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिल शेंडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कवी बांगारे आणि मॅन ऑफ सिरिज सचिन लांघी याला सायकल भेट देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघातील खेळाडू यांच्यासाठी भास्कर दिसले आणि ऋषीकेश राणे यांनी टी शर्ट दिले होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फ्रेंडशिप इलेव्हनचे कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.

Exit mobile version