| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तसेच लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे.
1980 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून सर्वात जास्त काळ पक्षाचे अध्यक्ष राहिलेले लालकृष्ण आडवाणी हे एकमेव नेते आहेत. पहिल्यांदा ते 1986 ते 1990 आणि नंतर 1993 पर्यंत अध्यक्ष होते. 1998 आणि त्यानंतर ते 2004 ते 2005 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते. खासदार म्हणून 3 दशके त्यांनी संसदेत काम केले. भाजप सरकार आल्यावर आडवाणी आधी गृहमंत्री बनले आणि नंतर अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात 1999-2004 या काळात ते उपपंतप्रधान होते. राम मंदिर आंदोलनाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी 1990 च्या दशकात राम मंदिरासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर केला होता. राष्ट्रपती भवनातून याबाबत निवेदन जारी करण्यात आली होती. कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.