सिडकोच्या मेडी सिटीला स्थानिकांचा विरोध


| श्रीवर्धन | वार्ताहर |
उरण तालुक्यातील पिढ्यांन् पिढ्या वसलेली गावे उठवून तेथे सिडको मेडी सिटी नावाचा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला असून, आमची एक इंचही जागा देणार नाही, असे सिडकोला ठणकावून सांगितले.

दरम्यान, येथील गावे, घरे वाचविण्यासाठी सिडकोबाधित घरे व जमीन बचाव कृती समिती, उरणतर्फे सिडको कार्यालय, सीबीडी बेलापूर येथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. कॉ. भूषण पाटील, अरविंद घरत व अनेक बंधू-भगिनींनी नेतृत्व केले.

सिडकोचे जॉईंट एम.डी. यांची शिष्टमंडळाने भेट घेतली आणि हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, त्यासाठी एक इंचही जमीन देणार नाही, असे त्यांना ठणकावून सांगितले.अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांनी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या सर्व संघटनांना बरोबर घेऊन उरण-पनवेल ते मंत्रालय असा महामोर्चा काढण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले.

Exit mobile version