लोकनेते दि.बा. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कामाचा शुभारंभ

| उरण | प्रतिनिधी |

उरणकरांचे प्रतीक्षेत असलेले लोकनेते दि. बा. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कामाचा शुभारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर विजय शिरढोणकर कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आला. जवळजवळ बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उरणकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे अभियांत्रिकी महाविद्यालय निर्माण व्हावे यासाठी विविध मान्यवरांनी प्रयत्नांची पराकष्ट केली आहे. त्यामध्ये अध्यक्ष दिनेश घरत, कॉम्रेड भूषण पाटील, सुधाकर पाटील, संतोष पवार, काशिनाथ गायकवाड यांनी मेहनत घेतली. यावेळी राजेंद्र शिरढोणकर, विजय शिरढोणकर विकासक म्हणून काम पाहतील. यावेळी विजय शिरढोणकर यांनी सांगितले की, या संकुलमध्ये अभियांत्रिकी विद्यालय उभारणार असून या महाविद्यालयामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस शिक्षण दिले जाणार आहेत. यामध्ये लॉ कॉलेज, अभियांत्रिकी कॉलेज आर्किटेक्चर तसेच सुरुवातीपासूनच्या शिक्षणाचा समावेश असेल. तसेच लोकनेते दि.बा. पाटील शैक्षणिक संकुल उभारणार असून दि.बा. पाटील साहेबांचे शिल्पदेखील उभारणार. एक भव्य दिव्य इमारत म्हणून याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष वेधणार आहोत. तर यामध्ये उच्चशिक्षित शिक्षक वर्ग अनुभव प्रदान करणार आहेत. चांगल्या दर्जाचे शिक्षण या संकुलातून मिळणार असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न राहतील, यासाठी आम्हास कमिटीचा सपोर्ट महत्त्वाचा राहील.

Exit mobile version