नोकरी शोधताय? ‘या’ विभागासोबत काम करण्याची आहे सुवर्णसंधी!

सारळ | वार्ताहर |
केंद्र सरकारच्या ग्रामीण डाक जीवन व डाक जीवन विम्याच्या ग्रामीण व शहरी क्षेत्रांमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी आता सुशिक्षित तरुण, तरुणींना त्यासोबत वय 18 ते 50 वर्षांमधील सर्वांनाच उपलब्ध झाली आहे. यासाठी डाक विमा प्रतिनिधी (डायरेक्ट एजंट) म्हणून निवडप्रक्रिया रायगड डाक विभागात सुरु करण्यात आली आहे.

विमा प्रतिनिधींची नेमणूक अधीक्षक डाकघर, रायगड विभाग , अलिबाग 402201 यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज पाठविताना उमेदवाराने सोबत जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर, इमेल आयडी, तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रे पाठवावीत. यासाठी 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात राहणारा उमेदवार हा 10 वी पास असावा तसेच 5000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागात राहणारा उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्यक आहे.

कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी/ माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्य-कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार/ स्वयंरोजगार असणारे तरुण, तरुणी किंवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवार अर्ज पाठवू शकतात. निवड झालेल्या उमेदवारास रु 5000/- ची अनामत ठेव ठेवावी लागेल. या क्षेत्रांमध्ये त्यांच्या कामाचा मोबदला कमिशन स्वरूपात दिला जाणार आहे. भारतीय डाक विभागासोबत काम करण्याची सुवर्णसंधीचा फायदा होतकरू तरुण, तरुणींनी करून घ्यावा, असे आहवान रायगड डाक अधीक्षक ए.जी. पाखरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version