रिक्षा चालकांकडून ग्राहकांची लुट

मिटरनुसार भाडे आकारण्याची मागणी

। पेण । प्रतिनिधी ।

पेण शहरामध्ये काही रिक्षा चालकांची सुरू असलेल्या मनमानीमुळे आता ग्राहक आवाज उठवू लागले आहेत. यावेळी पेण येथील ज्येष्ठ नागरिकांनी पेण तालुका पत्रकार संघटनेकडे लेखी तक्रार दिली, असून त्यामध्ये काही रिक्षा चालक कसे उध्दट वागतात व जास्तीचे पैसे घेतात या विषयी भाष्य केले असून या विषयावर प्रसार माध्यमांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.

पेण शहरामध्ये पेण एसटी स्टॅन्ड, कोतवाल नाका, पोलीस स्टेशन, कोलीवाडा नाका, चावडी नाका, प्रेम नगर, रामवाडी या ठीकाणी रिक्षा थांबा आहे, परंतु हे सर्व थांबे कायदेशीर नाहीत. तसेच, पेण एसटी डेपो-रामवाडी 40 ते 50 रूपये, रामवाडी-पेण एसटी डेपो 50 रू. पुन्हा पेण एसटी डेपो-प्रायव्हेट हायस्कूल 30 रू, पेण एसटी डेपो-कारमेल हायस्कूल 50 रू, पेण एसटी डेपो-गुरूकुल 30 रू, पेण एसटी डेपो-रेल्वे स्टेशन 30 रू असे भाडे असून काही रिक्षा चालक जास्तीचे भाडे आकारून ग्राहकांची लुट करत आहेत. या विषयी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर असे लक्षात आले की, कमीत कमी 23 रूपये एवढे भाडे पेण शहरात आकारायचे आहेत. त्याच्या पुढे 10 मिटर मागे 2 रूपयांची वाढ करायची आहे. तसेच, रात्री 12 ते सकाळी 5 पर्यंत होणार्‍या भाड्यामध्ये 25 टक्के वाढ करायची असते. परंतु, रिक्षा चालक आपल्या मर्जीप्रमाणे भाडे आकारत असून ग्राहकांची लुट करत आहेत. त्यामुळे पेणमध्ये मिटर प्रमाणे भाडे आकारावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पेण शहरामध्ये मिटर प्रमाणे भाडे आकारावे म्हणून आम्ही केव्हाच सुचना दिल्या आहेत आणि त्यानुसार रिक्षा चालकांनी भाडे घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. असे भाडे रिक्षा चालक आकारत नसतील तर ग्राहकांनी आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही त्या रिक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई करू.

हेश देवकाते,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
Exit mobile version